(टीप: प्रस्तुत लेखातील संस्कृत श्लोक हे प्रशस्तपादभाष्यातील, इंग्रजी अनुवाद हा महामहोपाध्याय पंडित गंगानाथ झा यांच्या इंग्रजी भाषांतरातून घेतला आहे. त्याखाली भावानुवाद केला आहे. नंतरच्या तिरक्या अक्षरातील मराठीतील टिपा उदाहरण या अर्थ सोपा करण्याच्या हेतूने देण्यात आल्या आहेत.
पदार्थ ज्या द्रव्यांचा बनलेला असतो ती द्रव्ये कोणती?
एक पदार्थ एकाच द्रव्याचा असेल असे नाही. याठिकाणी पाश्चात्य विज्ञान म्हणते त्या प्रमाणे बर्फ हा स्थायू , पाणी हा द्रव व वाफ हा वायू इतकाच अर्थ नाही. वैशेषिकाचा विचार करताना पदार्थाच्या संदर्भात कोणकोणती जुळलेली द्रव्ये असू शकतात हे पहिले पाहिजे.
पदार्थांचे गुण किती व कोणते?
पदार्थांच्या हालचालींचे प्रकार किती व कोणते?
पदार्थांचे वर्गीकरण कसे करायचे? ते वर्ग कोणते?
पदार्थाचा लहानात लहान कण कोणता?
पदार्थाचे अविभाज्य घटक कोणते?
एखाद्या
कॅलिडोस्कोप मधून साध्याच काचेच्या चुऱ्याच्या वेगवेगळ्या सुंदर रचना दिसाव्यात
तसेच वैशेषिकांनी पदार्थाकडे पहायचे सहा दृष्टिकोन सांगितले आहेत. त्यांमधून
कोणत्याही पदार्थाची सहा अंगे दिसतात. खाली दिलेल्या प्रश्नांच्या माध्यमातून या
सहा अंगांविषयी माहिती दिली आहे. ते प्रश्नसुद्धा समजायला सोपे जावे म्हणून दिले आहेत.)
पदार्थ ज्या द्रव्यांचा बनलेला असतो ती द्रव्ये कोणती?
प्रशस्तपाद
म्हणतात:
अथ के द्रव्यादय: पदार्था:, किञ्च तेषां
साधर्म्यं विधर्म्यञ्चेति |
Question: Which are the categories, substance and the rest?
And what are their similarities and dissimilarities?
पदार्थातील
ती द्रव्ये कोणती? त्यांच्यातील सारखेपणा आणि वेगळेपणा कोणता?
वैशेषिक
विश्लेषण पद्धतीचा हा पहिला टप्पा. यात पदार्थ कोणत्या द्रव्याचा बनला आहे याचा
विचार होतो.
तत्रद्रव्याणि पृथव्यप्तेजोर्वाय्वाकाशकालदिगात्ममनांसि
सामान्यविशेषसंज्ञयोक्तानि नवैवेति |
तद्व्यतिरेकेणान्यस्य संज्ञानभिधानात् ||
Answer: Among these the substances are – Earth, Water,
Light, Air, Plasma (Akash), Time, Space, Self and Mind. These mentioned in the
sutra by their general as well as specific names, are nine only; as besides
these none other is mentioned by name.
ती
द्रव्ये म्हणजे स्थायू (solid), द्रव(liquid), ऊर्जा/उष्णता/प्रकाश(energy), वायू(gas), आकाश(plasma), काल(time), स्थल(space), आत्मा(self/atma) व मन(mind). वैशेषिक
सूत्रांमध्ये नावांसहित वर्णन केल्या प्रमाणे ती संख्येने ९ इतकी भरतात. बाकी इतर
कुठल्याही द्रव्याची नोंद सूत्रामध्ये नाही.
एक पदार्थ एकाच द्रव्याचा असेल असे नाही. याठिकाणी पाश्चात्य विज्ञान म्हणते त्या प्रमाणे बर्फ हा स्थायू , पाणी हा द्रव व वाफ हा वायू इतकाच अर्थ नाही. वैशेषिकाचा विचार करताना पदार्थाच्या संदर्भात कोणकोणती जुळलेली द्रव्ये असू शकतात हे पहिले पाहिजे.
सर्वप्रथम भूतद्रव्ये कोणती आहेत हे पाहूया.
भूत द्रव्ये म्हणजे डोळे, कान, नाक, त्वचा व जीभ यांना त्या पाण्याविषयांनी जाणवलेले गुण व त्यामुळे कळलेली द्रव्ये.
म्हणजे पाणी हा पदार्थ म्हटला तर तो 'द्रव(liquid)' रूप आहे हे आलच. पण जर पाण्याला रंग असेल वास असेल तर त्यामध्ये कोणतातरी 'स्थायू(solid)' द्रव्याचा अंश मिसळला आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. पाणी जर कोमट असेल तर त्यामध्ये उष्णतारूपात 'तेज'(heat/ thermal energy) द्रव्य आलेलं आहे.
आता कोणती महाभूत द्रव्ये तेथे आहेत ते पाहूया. ही द्रव्ये म्हणजे इंद्रियांना न कळणारी तरीही जाणीवरूपात असणारी द्रव्ये. ती सर्व ठिकाणी असतातच असतात. त्यात पाहिलं म्हणजे पाणी ज्या भांड्यात आहे त्यानुसार त्याचं 'स्थल'(space) द्रव्य आलं. पाणी भांड्यात किती काळ आहे त्यावरून 'काल '(time) द्रव्य आलं . शिवाय पाण्यासंबंधी जी कंपने(waves, oscillations) आहेत ती त्या पाण्याच्या 'आकाश' द्रव्यात येतात. शिवाय पाण्यासंबंधी तुम्ही विचार करत असला (तो ग्लास अर्धा रिकामा किंवा अर्धा भरलेला आहे वगैरे) तर त्यात तुमचे 'मन'(mind) व 'आत्मा'(soul) द्रव्यही उतरतं
पदार्थांचे गुण किती व कोणते?
गुणाश्च
रूपरसगन्धस्पर्शसंख्यापरिमाणपृथक्त्वसंयोगविभागपरत्वापरत्वबुद्धिसुखदु:खेच्छाद्वेषप्रयत्नाश्चेति
कण्ठोक्ता: सप्तदश |
चशब्दसमुच्चिताश्च
गुरुत्वद्रवत्वस्नेहसंस्काराटदृष्टशब्दा: सप्तैवेत्येवं चतुर्विंशतिर्गुणा: ||
The qualities are: - colour, taste, odour, touch, number,
dimension, separateness, conjunction, disjunction, distance, proximity,
intellect, pleasure, pain, desire, aversion and effort; these are the seventeen
that are directly mentioned in the Sutra. The word cha in the Sutra indicates
the other seven viz. gravity, fluidity, viscidity, faculty, the two-fold
invisible force and sound. These make up the twenty four qualities.
पदार्थाचे पूर्वापार पध्दतीने सांगितले गेलेले गुण म्हणजे: रूप/रंग, रस/चव, गन्ध/वास, स्पर्श/तापमान, संख्या, मिती/मोजमापे/परिमाण, वेगळे असणे, जोडलेले असणे, तुटलेले असणे, लांब असणे, जवळ असणे, बुद्धी, सुख, दु:ख, लालसा, द्वेष, गती निर्माण करणे हे १७ गुण वैशेषिक सूत्रांमध्ये वर्णन केले गेलेले आहेत. याशिवाय यात न सांगितलेल्या गुरुत्वाकर्षण, प्रवाहीपणा, अप्रवाहीपणा, शारिरिक वा मानसिक शक्ती, धर्म/मोक्षगामी/विधायकतेकडे नेणारे बळ , अधर्म/विनाशगामी/विनाशकते कडे नेणारे बळ व शब्द/तरंग या ७ गुणांसह ही संख्या २४ इतकी भरते.
सर्वच द्रव्यांसाठी मिळून हे २४ गुण दिले गेलेले आहेत. प्रत्येक पदार्थाशी जोडल्या गेलेल्या द्रव्यांवरही त्या पदार्थाचे गुण अवलंबून असतात. या २४ पैकी प्रत्येक द्रव्यानुरूप वेगवेगळे गुणांचे गट लागू पडतात. पदार्थानुरुप हे गुण असतील किंवा नसतीलही. इथे केवळ सर्व गुणांचा आवाका लक्षात आणून दिला आहे. वर दिलेल्या पाण्याच्या उदाहरणात पाहिल्याप्रमाणे त्यातील सर्व घटक द्रव्यांचे गुण याठिकाणी पाहिले पाहिजेत. आधुनिक भौतिकशास्त्रात या सर्व गुणांचा अभ्यास करण्यासाठी वेगवेगळी उपशास्त्रे निर्माण झाली आहेत व मोजमापांसाठीची उपकरणे तर मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत व त्यांमध्ये अचूकताही आलेली आहे.
वैशेषिकातील गुण
(Property
in Vaisheshik)
|
आधुनिक अर्थ
(modern meaning)
|
आधुनिक विद्याशाखा
(Modern Branch of study)
|
मोजमापनयंत्र
(Instrument to measure)
|
एकक
(measurement unit)
|
रूप
|
Colour
|
Colorimetry
|
Spectrophotometer
|
Candela
|
रस
|
Taste
|
|||
गन्ध
|
Odour
|
Olfactometer
|
||
स्पर्श
|
Temperature
|
Thermometer
|
Celsius
|
|
संख्या
|
Number
|
Statistics
|
Number Systems
|
|
परिमाण
|
Dimension
|
Measurements of length, breadth, volume etc
|
Vernier calliper, measurement tapes
|
Meter
|
पृथकत्व
|
Separateness
|
|||
संयोग
|
Conjunction
|
|||
विभाग
|
Dis-junction
|
|||
परत्व
|
Distance
|
Kinetics
|
Meter
|
|
अपरत्व
|
Proximity
|
|||
बुद्धि
|
Intellect
|
|||
सुख
|
Pleasure
|
|||
दु:ख
|
Pain
|
|||
इच्छा
|
Desire
|
|||
द्वेष
|
Aversion
|
|||
प्रयत्न
|
Effort
|
Kinetics
|
||
शब्द
|
Wave
|
Waves and Oscillations
|
Oscilloscope
|
Hertz
|
गुरुत्त्व
|
Gravity
|
Gravitation
|
||
द्रवत्व
|
Fluidity
|
Mechanics
|
||
स्नेह
|
Viciousness
|
Mechanics
|
||
संस्कार
|
Faculty
|
|||
दृष्ट
|
Constructive Force
|
Mechanics
|
Newton
|
|
अदृष्ट
|
Destructive Force
|
Mechanics
|
Newton
|
पदार्थांच्या हालचालींचे प्रकार किती व कोणते?
उत्क्षेपणापक्षेपणाकुञ्चनप्रसारणगमनानि
पञ्चैव कर्माणि |
Throwing upwards, throwing downwards, contracting,
expanding, and going – these are the only five actions.
वर
फेकणे, खाली टाकणे, आकुंचन पावणे, प्रसरणपावणे व जात राहणे हे या हालचालीचे पाच प्रकार
आहेत.
यातील
पहिल्या दोन हालचाली या अदृश्य बळ व गुरुत्वाकर्षणाशी संबंधित आहेत. नंतरच्या दोन
या अदृश्य बळ व पदार्थाची स्थितीस्थापकता यांच्याशी संबंधातल्या आहेत. पाचवी
क्रीया ही मात्र संमिश्र स्वरूपाची आहे व ती अनेक क्रीयांचा गटच आहे.
गमनग्रहणाद्भ्रमणरेचनस्यन्दनोर्ध्वज्वलनतिर्य्यक्पतननमनोन्नमनादयो
गमनविशेषा न जात्यन्तराणि ||
Because of the mention of the going : all such actions such
as gyrating, evacuating, quivering, flowing upwards, transverse falling,
falling downwards, rising and the like, being the particular forms of Going,
and not forming distinct classes by themselves.
गोलगोल
फिरणे, रिकामं करणे, कंप पावणे, वर वाहणे, वरून खाली पायरी पायरीने पडत येणे, थेट खाली
पडणे, वर जाणे आणि अशा अन्य क्रीया या ‘जात राहणे’ या वर नमूद केलेल्या गटातच
मोडतात. त्यांचे वेगळे गट पाडायची आवश्यकता नाही.
आधुनिक भौतिकशास्त्रामध्ये या संबंधीचा अभ्यास मोठ्या प्रमाणात झाला. अगदी पुरातन ग्रीक चिंतकांपासून ते न्यूटनची पारंपारिक भौतिकी व नंतर आइनस्टाईन पर्यंत या गतीचा सर्वांनीच वेगवेगळा अभ्यास केला आहे. पारंपारिक भोतिकी(classical physics), पुंज भौतिकी(quantum physics), यामिकी(mechanics), पुंज यामिकीपर्यंत(quantum mechanics) याविषयी खूपच अभ्यास व संशोधन झालेले आहे.
आधुनिक भौतिकशास्त्रामध्ये या संबंधीचा अभ्यास मोठ्या प्रमाणात झाला. अगदी पुरातन ग्रीक चिंतकांपासून ते न्यूटनची पारंपारिक भौतिकी व नंतर आइनस्टाईन पर्यंत या गतीचा सर्वांनीच वेगवेगळा अभ्यास केला आहे. पारंपारिक भोतिकी(classical physics), पुंज भौतिकी(quantum physics), यामिकी(mechanics), पुंज यामिकीपर्यंत(quantum mechanics) याविषयी खूपच अभ्यास व संशोधन झालेले आहे.
पदार्थांचे वर्गीकरण कसे करायचे? ते वर्ग कोणते?
सामान्यं द्विविधं |
परमपरञ्चानुवृत्तिप्रत्ययकारणम् |
तत्र परं सत्ता, महाविषयत्वात् |
सा चानुवृत्तेरेव हेतुत्वात् सामान्यमेव ||
Of generality or community, there are two kinds; the higher
and lower; and it serves as the basis of inclusive or comprehensive cognition.
The higher (or highest) generality is that of ‘being’; as it is this that-
extends over the largest number of things; and also because it is this alone
that is generality pure and simple, always serving, as it does, as the basis of
comprehensive cognitions.
वर्गीकरणाचे
दोन प्रकार आहेत: वरचा व खालचा. वरचा गट हा सर्वसमावेशक किंवा सर्वव्यापी
प्रकारातला. हा सर्वात मोठा गट म्हणजे जाणीवरूप अस्तित्वाचा असून तो जवळजवळ सर्वच
पदार्थांना व्यापतो व त्यामुळे तो जवळपास सगळीकडेच दिसतो. हा गट शुद्ध व सोपा आहे
व म्हणूनच सर्वव्यापी आहे.
वरचा गट
हा महाभूतांचा गट असून यात आकाश, काल, स्थल, मन व आत्मा ही द्रव्ये असतात. या
द्रव्यांना जाणीव रूपातील अस्तित्व आहे. मूळात या वर्गीकरणापासून एकंदरित भारतीय वर्गीकरणशास्रांचा उगम होतो. आधुनिक शास्त्रातील गटाची संकल्पना (Set Theory) ही याच्याशी संबंधित आहे पण ती मूलत: गणिती अंगाने जाते.
द्रव्यत्वाद्यपरम्, अल्पविषयत्वात् |
तच्च व्यावृत्तेरपि हेतुत्त्वात् सामान्यं
सद्विशेषाख्यामपि लभते ||
The lower generalities are ‘substance’ and the rest, which
extend over limited number of things. These latter being the basis of inclusive
as well as exclusive cognitions, are sometimes regarded as individualities
also.
काही
विशिष्ट द्रव्यांपुरताच असणारा खालचा गट हा तुलनेने लहान गट आहे. या गटातील
पदार्थांना भौतिक अस्तित्व असून ते इंद्रिय गोचर असते. या मुळेच या गटातील
पदार्थांना अणुस्तरवरही विशेष अस्तित्व असते. तेच त्यांचे वेगळेपणही ठरते. केवळ
यामुळेच त्यांचा वेगळा गट पडतो.
खालचा
गट हा भूतांचा असून त्यात स्थायू, द्रव, वायू व ऊर्जा/तेज/उष्णता ही द्रव्ये
येतात. या द्रव्यांना इंद्रीयांनी जाणून घेता येते. या द्रव्यांना
सूक्ष्मस्तरावरही अणुरूप जडरूप अस्तित्व असते. हेच विशेषत्व किंवा अणुत्व होय.
वैशेषिक तत्वज्ञानातील विशेषत्व ते हेच.
पदार्थाचा लहानात लहान कण कोणता?
नित्यद्रव्यवृत्तयोऽन्त्या विशेषा: |
ते खल्वत्यन्तव्यावृत्तिहेतुत्वाद्विशेषा
एव ||
The ultimate specializing factors inhering in eternal
substances are the individualities. In as much as they serve the purpose of
absolute exclusion, they are individualities, pure and simple.
या कायम
जडरूप किंवा भौतिक अस्तित्व दर्शवणाऱ्या द्रव्यांमध्ये सूक्ष्मस्तरावर जाऊनही जे
उरतं ते त्यांचं विशेषत्व. जोपर्यंत ते वेगळे अस्तित्व त्याला इतरांपेक्षा वेगळं
असं अस्तित्व असल्याचं दर्शवतं तो पर्यंतच ते त्याचं विशेषत्व असतं. हे सरळ व सोपं
आहे.
स्थायूचा
लहानात लहान कण हा स्थायूच असतो. उदाहरण म्हणजे सोनं. त्याचा लहानात लहान कण हा
सोन्याचा अणू असेल. तो अणू हेच सोन्याचं विशेषत्व. जोपर्यंत तो द्रव्याच्या
गुणांशी साधर्म्य दाखवतो तो पर्यंतच तो विशेष आहे. विशेषत्व पाहण्याच्या या
अभ्यासात कोणतीही रासायनिक बदल अभिप्रेत नाही. म्हणजेच पाणी थंड केले किंवा तापवले
तरीही ते पाणीच राहते. पाण्याचा रेणू हेच पाण्याचा विशेष. आधुनिक काळात डाल्टन, अवोगॅड्रो व रॉबर्ट ब्राऊन यांचे कार्य विशेषत्वाने उल्लेख करण्यासारखे आहे.
पदार्थाचे अविभाज्य घटक कोणते?
अयुतसिद्धानामाधार्य्याधारभूतानां य:
सम्बन्ध इह प्रत्ययहेतु: स समवाय : |
Inherence is the relationship subsisting among things that
are inseparable, standing to one another in the character of the container and
the contained - such relationship being the basis of the idea that ‘this is
that’.
एकमेकांपासून
वेगळे न काढता येऊ शकणारा संबंध जिथे दिसतो, म्हणजे पदार्थ व त्यातील अविभाज्य घटक
यात जो संबंध, तोच तो समवाय संबंध.
उदाहरणार्थ
एक कापड व त्याचे धागे. धागे काढावेत तसे कापडाचे अस्तित्व संपत जाते. म्हणजे कापड
व धागे यांच्यात समवाय संबंध असतो. पाण्याचा हायड्रोजन व ओक्सिजनशी जो संबंध तोही
समवाय संबंध. थोडक्यात कुठल्याही पदार्थाचा त्याच्या अविभाज्य घटकाशी जो संबंध तो
समवाय संबंध.
एवं धर्म्मैविना धर्म्मिणामुद्देश: कृत: ||
So far we have mentioned the objects without saying anything
as to their properties.
आता
पर्यंत आपण पदार्थांच्या अंगांचा केवळ उल्लेख केला. पण त्यांच्या गुणांविषयी
तपशीलात काहीही सांगितलेले नाही.
पदार्थाचे
द्रव्य कोणते, त्याचे गुण कोणकोणते असू शकतात, त्याचे अविभाज्य घटक कोणते, त्याची
हालचाल कशी होते, तो कोणत्या गटात मोडतो व त्याचा लहानात लहान कण कोणता या सहा
प्रकाराने पदार्थाचा अभ्यास करायचा असतो. एवढंच आतापर्यंत सांगितलंय. ही अभ्यासाची
रूपरेषा झाली. पण निश्चित असं काही हाती लागण्यासाठी या सहा अंगाच्या पट्ट्या
वापरून विविध पदार्थांचा तुलनात्मक अभ्यास करणे आवश्यक आहे. तो पुढे होईल.
सारांश
वैशेषिकाच्या दृष्टिकोनातून कोणत्याही पदार्थाचा अभ्यास करणे म्हणजे त्याच्या
द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष, व समवाय या सहा अंगांचे ज्ञान करून घेणे.
यातील पाहिली तीन ही इंद्रियांना कळणारी व नंतरची तीन ही बुद्धीला कळणारी आहेत. या
अंगांची माहिती करुन घेण्यासाठी खालील प्रश्न उपयोगी ठरतात:
इंद्रियांना
जाणवाणारी अंगे:-
द्रव्य(substance):पदार्थ
ज्या द्रव्यांचा बनलेला असतो ते द्रव्य कोणते? द्रव्याचे एकूण प्रकार नऊ.
गुण (properties): पदार्थाचे गुण
कोणते? एकूण गुण २४ आहेत.
कर्म (action): पदार्थाची हालचाल
कशी होते? हालचालींचे एकूण प्रकार पाच.
बुद्धीला
कळणारी अंगे:-
सामान्य
(set/classification): पदार्थाचे वर्गीकरण कसे करावयाचे?
विशेष (individuality): पदार्थाचा लहानात
लहान कण कोणता?
समवाय (Inherence/Inseparable
components):
पदार्थाचे
अविभाज्य घटक कोणते?
उदाहरणाच्या
माध्यमातून सांगायचं झाल्यास ‘गरम चहा’ या पदार्थाची सहा अंगे खालील आकृतीद्वारे
दाखवता येतील:
ही झाली पहिली पायरी. याविषयीची अधिक माहिती पुढील
धड्यांमध्ये मूळ पदार्थधर्म संग्रह या ग्रंथातील क्रमानुसार येईल.
No comments:
Post a Comment