विक्रम
राजा एक चाणाक्ष राजा. कोणत्याही गोष्टीत पुढे पाऊल टाकण्या आधी त्याचे सर्व
कंगोरे अभ्यासणारा. कोणत्याही पदार्थाचा सखोल अभ्यास करणारा. मग तो पदार्थ त्याचा
राजवाडा असो, तोफेसाठी निवडले जाणारे धातू असोत, अलंकारांसाठी वापरले जाणारे सोने,
रुपे असो किंवा तलवारी, भाल्यांसाठी वापरले जाणारे पोलाद असो किंवा देवादिकांच्या
मूर्ती घडवण्यासाठी तयार केलेले अष्टधातू मिश्रण असो, तलावांमधले पाणी असो,
धान्यकोठारांमधली धान्याने भरलेली पोती असोत किंवा डोंगराळ भागातली घरांची जोती
असोत. शिवाय राज्याच्या डोंगरांवर मिळणारे खडक असोत, विविध भागातली माती असो,
वृक्ष, जलचर, वनचर, खेचर, अगोचर कोणीही असोत..सर्वांचा अभ्यास करण्याची त्याची
विशिष्ट अशी पद्धत होती, एक सूत्र होते..अंधाऱ्या रात्री अनेक स्थिरचर, वनचर
पदार्थांचा मनोमन अभ्यास करत तो निघाला होता त्याच्या गंतव्याकडे..एक एक पदार्थाचा
अभ्यास करत, त्याविषयीच्या गुंतागुंतीच्या कल्पनांची गाठ सोडवत..
“हेच ते
तुम्हा मानवांचं जरा जास्त चालणारं डोकं..नसता कीस पाडायचा..पण मला सांग तुम्ही हा
अभ्यास करता त्याला काही पद्धत आहे का?
काही सूत्र आहे का?”
“आहे ना
वेताळा जरूरच आहे. महर्षि कणादांनी सांगितलेल्या वैशेषिक सूत्रात आणि त्याच विचार
परंपरेत मैलाचा दगड ठरलेल्या पदार्थधर्मसंग्रह या ग्रंथात, सर्वाच्या मुळाशी ही
पदार्थाची विविध सहा अंगे क्रमाक्रमाने जाणून घेण्याची ही पद्धत आहे. ती सहा अंगे
म्हणजे द्रव्य(substance), गुण(properties), कर्म(Actions), सामान्य(classification), विशेष(individuality) व समवाय(inherence).”
“अरे हो
रे विक्रमा तू आधीपण हे सांगितलं होतंस..पण अश्या पद्धतीचं प्रयोजन काय? ही सहाच
अंगे का? पाच किंवा सात का नाही?”
“वेताळा,
माणूस जेव्हा त्याच्या सभोवतालच्या वातावरणात वावरतो, तेव्हा तो विविध प्रकारे ते
वातावरण समजून घेण्याचा प्रयत्न करतो. डोळ्यांनी तो वस्तूचे रंग रूप बघतो, कानांनी
आवाज ऐकतो, नाकाने वास घेतो, त्वचेने उष्ण किंवा थंडपणाचा अनुभव घेतो व जीभेने चव
पाहतो. पण हे सर्व त्या इंद्रियांना कळल्यावर ती माहिती मेंदूला जाते व तिथे
त्याचे अर्थ काढले जातात. एखाद्या पदार्थाचे असे विविध अंगांनी घेतलेले अनुभव
त्याच्या मेंदूला त्या पदार्थाचे व्यक्तिमत्व रेखाटायला मदत करतात. पण मेंदू इथवरच
थांबत नाही, तो त्या पदार्थाचे वर्गीकरण करतो, त्या पदार्थाचा लहानात लहान कण कसा
असेल याचा मागोवा घेतो, शिवाय त्या पदार्थाच्या उगमाशी जातो आणि त्याच्या घटक
द्रव्यांचाही अभ्यास करतो. हे सर्व दृष्टिकोन वैशेषिक विचारसरणीत लक्षात घेतलेले
असून तेच ह्या सहा अंगांमधून प्रतीत होतात. द्रव्य(substance), गुण(properties), कर्म(actions) ही पहिली तीन अंगे इद्रियांनी अभ्यासली
जातात. त्याचा अभ्यास झाल्यावर सामान्य(classification), विशेष(individuality) व समवाय(inherence) ही अंगे मेंदूच्या
विचारक्षमतेशी निगडीत आहेत.”
“अरे
विक्रमा हे सर्व ठीक आहे. पण मला उदाहरण आवडतं रे, असं पाल्हाळ आपण कितीही चालवू
शकतो. थांब मीच तुला एक उदाहरण देतो. समजा, आजच्या नवीन काळातली काव्या नावाची एक
शाळेत जाणारी मुलगी आहे, असेल दुसरी तिसरीत. शाळेत जाण्यासाठी तिला दप्तर भरावे
लागते. तर तिचं भरलेलं दप्तर हा एक पदार्थ घेतला तर त्या दप्तराची सहा अंगे कशी
ओळखावी? एक पदार्थ म्हणून तिच्या त्या भरलेल्या दप्तराचा अभ्यास कसा करावा?”
“वा..छान
उदाहरण..तर वेताळा आपण असं पाहू की ही काव्या सकाळी दप्तर घेऊन शाळेत जाते. परत ते
घेऊन दुपारी घरी येते. या दप्तरात ती इंग्रजी, गणित, शास्त्र, हिंदी व मराठी
यासारख्या विषयांची पुस्तके भरते, वह्या भरते, कंपास पेटी भरते, शाळेचा डबा भरते,
टोपी ठेवते, रुमाल ठेवते, ओळखीसाठी लागणारं I-card ठेवते. शिवाय तिला शाळेने दिलेली
दैनंदिनी(diary) ठेवते.
खडूचा डबा ठेवते, पाण्यासाठीची वॉटरबॅग बाहेरच्या कप्प्यात ठेवते. शिवाय तिला
शास्त्राच्या प्रकल्पासाठी चुंबक(magnet) आणि लोखंडाचा कीस(iron burr) आणायला सांगितला होता तो पण ती ठेवते. शिवाय या
मुलीच्या बॅगेमध्ये तिच्या सुरक्षिततेसाठी एक चिप बसवली आहे. त्यामुळे ती मुलगी
कुठे आहे याची माहिती तिच्या आईवडिलांना त्यांच्या भ्रमणध्वनीवर(cell phone) मिळत राहते. ”
“अरे
अरे काय हे विक्रमा..इतकं सगळं त्या छोट्या जीवाच्या पाठीवर? आणि हे काय चिप वगैरे..”
“ती
वेगळी गोष्ट आहे वेताळा. असो. तर या चिमुकलीची ही भरलेली बॅग हा एक पदार्थ म्हणून
घेतला तर आपण त्या बॅगेची द्रव्य(substance), गुण(properties), कर्म(actions), सामान्य(classification), विशेष(individuality) व समवाय(inherence) ही अंगे कोणती आहेत
ते पाहू.”
“आता
पहिल्या प्रथम पाहू की त्या बॅगेत कोणकोणती द्रव्ये आहेत?”
“सोप्पंय..बॅग
कापडाची आहे..कापड हे द्रव्य..”
“नाही
वेताळा..द्रव्ये म्हणजे त्या बॅगेत पृथ्वी(solid), आप(liquid), वायू(gas), तेज(energy), आकाश(waves/plasma), दिक्(space), मन(mind), काल(time), आत्मा(soul)
कशाकशास्वरूपात आले
आहेत.. ..प्रशस्तपाद म्हणतात..
तत्रद्रव्याणि पृथव्यप्तेजोर्वाय्वाकाशकालदिगात्ममनांसि
सामान्यविशेषसंज्ञयोक्तानि नवैवेति |
तद्व्यतिरेकेणान्यस्य संज्ञानभिधानात् ||
ती
द्रव्ये म्हणजे स्थायू (solid), द्रव(liquid), तेज/ऊर्जा/उष्णता/प्रकाश(energy), वायू(gas), आकाश(plasma), काल(time), स्थल(space), आत्मा(self/atma) व मन(mind). वैशेषिक
सूत्रांमध्ये नावांसहित वर्णन केल्या प्रमाणे ती संख्येने ९ इतकी भरतात. बाकी इतर
कुठल्याही द्रव्याची नोंद सूत्रामध्ये नाही.”
“अरे
काहीही काय? एवढं सगळं त्या चिमुकलीच्या बॅगेत आहे?”
“नावावरून
अवघड वाटत असलं तरीही उदाहरण दिलं की तुला कळेल..ही पहा त्या बॅगेतली द्रव्ये
द्रव्य |
शाळेच्या बॅगेतील उदाहरणे |
पृथ्वी (solid)
|
वह्या, पुस्तके,
बॅग, पेन्सिल, रबर, वॉटरबॅग, चुंबक, लोखंड चुरा, I-card, कंपासपेटी, खडू, चिप, डबा इत्यादि
|
आप
(liquid)
|
पाणी, डब्यातील
भाजीतील पाण्याचा अंश
|
तेज
(energy)
|
डब्याचा गरम पणा
|
वायू (gas)
|
हवा, डब्यात
दाबलेला वायू, वॉटरबॅगेत रिकाम्या जागेत असलेला वायू
|
आकाश
(plasma)
|
चुंबक व लोखंडाचा
कीस यांमधील चुंबकीय तरंग(magnetic waves), कंपास बॉक्सचा
होणारा खळ्ळ आवाज, डब्यातल्या वाट्या एकमेकांवर आपटून होणारा आवाज(sound
waves), चिपमधून GPS
कडे जाणारे तरंग (electro
magnetic waves)
|
दिक्
(space)
|
आधी बॅग बेडरूम
मध्ये होती, मग हॉल मध्ये, मग बसमध्ये, मग शाळेत, मग पुन्हा बस मध्ये, मग पुन्हा
घरी असे दिक् हे द्रव्य येउन जुळत राहिले व परत गेले.
|
काल (time)
|
पहाटे बॅग बेडरूम
मध्ये होती, मग ७ वाजता हॉलमध्ये, ८:३० वाजता बस मध्ये, ९ वाजता शाळेत, २:३० वाजता पुन्हा बसमध्ये, ३:३०
वाजता पुन्हा घरी असे काल हे द्रव्य त्या बॅग ला येऊन चिकटत राहिले व परत गेले.
|
मन (mind)
|
आइने सर्व
वह्या-पुस्तके आहेत की नाही ते पाहिलं
म्हणजे तिचं मन येऊन गेलं, लहान बहिणीनं उत्सुकता म्हणून त्यात डोकावलं म्हणजे
तिचं मन येऊन गेलं, आजोबांनी उचलून किती जड आहे ते पाहिलं म्हणजे त्यांचं मन
येऊन गेलं, बसमध्ये चढवणाऱ्या बाईनी ते उचललं म्हणजे त्यांचं, वर्गात काव्याच्या
शेजारी बसणऱ्या खट्याळ मुलाने त्यातली पेन्सिल काढली म्हणजे त्याचं अशी अनेक मनं
त्या बॅगेशी जुळून पुन्हा निघून गेली.
|
आत्मा
(soul)
|
वर उल्लेख
केलेल्यांचे आत्मेही त्या बॅगेजवळ येऊन परत गेले.
|
“अरे हे चाललंय काय? पदार्थविज्ञान आहे की मज्जा..हा चालला तो आला..पदार्थविज्ञान म्हणजे कसं गंभीर प्रयोगशाळेत तासन्तास विचार करत बसणं, दुर्बिणीला डोळे लावणं, विचारांच्या दुनियेत सफरचंदाच्या बागेत बसणं, ग्रहमंडळं तारे यांचा विचार करणं..कसं वजनदार वाटतं..तु उलटंच सांगतोस..मला तर तो खेळ वाटायला लागलाय..””
“अरे
वेताळा, उगीचंच हे गंभीर स्वरूप दिलंय..मस्त मजेत अनुभावायच्या या गोष्टी..असो तर
आता बॅगेतल्या गुण(properties) या अंगाकडे येऊ. प्रशस्तपाद म्हणतात..
गुणाश्च
रूपरसगन्धस्पर्शसंख्यापरिमाणपृथक्त्वसंयोगविभागपरत्वापरत्वबुद्धिसुखदु:खेच्छाद्वेषप्रयत्नाश्चेति
कण्ठोक्ता: सप्तदश |
चशब्दसमुच्चिताश्च
गुरुत्वद्रवत्वस्नेहसंस्काराटदृष्टशब्दा: सप्तैवेत्येवं चतुर्विंशतिर्गुणा: ||
पदार्थाचे
पूर्वापार पध्दतीने सांगितले गेलेले गुण म्हणजे: रूप/रंग, रस/चव, गन्ध/वास, स्पर्श/तापमान,
संख्या, मिती/मोजमापे/परिमाण, वेगळे असणे, जोडलेले असणे, तुटलेले असणे, लांब असणे,
जवळ असणे, बुद्धी, सुख, दु:ख, लालसा, द्वेष, गती निर्माण करणे हे १७ गुण वैशेषिक सूत्रांमध्ये वर्णन केले
गेलेले आहेत. याशिवाय यात न सांगितलेल्या गुरुत्वाकर्षण, प्रवाहीपणा, अप्रवाहीपणा,
शारिरिक वा मानसिक शक्ती, धर्म/मोक्षगामी/विधायकतेकडे नेणारे बळ , अधर्म/विनाशगामी/विनाशकते
कडे नेणारे बळ व शब्द/तरंग या ७ गुणांसह ही संख्या २४ इतकी भरते.”
“अच्छा
म्हणजे २४ गुण पहायचे..झालं तर..”
“तसं
नाही वेताळा, त्या बॅगेत जी जी द्रव्ये आपण ओळखली त्या सर्वांना हे २४ गुण लावून
पाहायचे..काही ठिकाणी जुळतील तर काही ठिकाणी नसतील..आपण उदाहरणा दाखल एक एक
द्रव्य घेऊ
वैशेषिकातील गुण
(Property
in Vaisheshik)
|
आधुनिक अर्थ
(modern meaning)
|
स्थायू – डबा
|
द्रव – पाणी
|
वायू - हवा
|
तेज - गरमपणा
|
आकाश – डब्याचा
आवाज
|
स्थल – घर, शाळा,
बस
|
काल – सकाळ,
दुपार, संध्याकाळ
|
मन – आई, आजोबा,
बहिण
|
आत्मा
|
रूप
|
Colour
|
|||||||||
रस
|
Taste
|
|||||||||
गन्ध
|
Odour
|
|||||||||
स्पर्श
|
Temperature
|
|||||||||
संख्या
|
Number
|
|||||||||
परिमाण
|
Unit
|
|||||||||
पृथकत्व
|
Separateness
|
|||||||||
संयोग
|
Conjunction
|
|||||||||
विभाग
|
Disjunction
|
|||||||||
परत्व
|
Largeness
|
|||||||||
अपरत्व
|
Smallness
|
|||||||||
बुद्धि
|
Intellect
|
|||||||||
सुख
|
Pleasure
|
|||||||||
दु:ख
|
Pain
|
|||||||||
इच्छा
|
Desire
|
|||||||||
द्वेष
|
Aversion
|
|||||||||
प्रयत्न
|
volition
|
|||||||||
शब्द
|
Wave
|
|||||||||
गुरुत्त्व
|
Gravity
|
|||||||||
द्रवत्व
|
Fluidity
|
|||||||||
स्नेह
|
Viciousness
|
|||||||||
संस्कार
|
Force
|
|||||||||
दृष्ट
|
Modified behaviour
|
|||||||||
अदृष्ट
|
Natural behaviour
|
(संदर्भ: Kanada’s Science of Physics – N.G. Dongre, S.G. Nene)”
“बापरे विक्रमा, आता तू हे सारे रकाने भरून घेणार की काय? ९ गुणिले २४ म्हणजे किमान २१६ गुण लिहायचे?”
“नाही वेताळा, हळू हळू एक एक गुण पाहू. वेगवेगळ्या द्रव्यांना वेगवेगळे गुण लागू पडतात. २४ हा एकूण आकडा आहे. वरच्या सारणीत हिरव्या रंगाने दाखवले आहेत ते ते त्या द्रव्यांना लागू पडणारे गुण. आत्ता तुला आवाका लक्षात यावा म्हणून सांगितलं. आता पुढचं अंग पाहू..कर्म(Actions) हे ते अंग..”
“बापरे विक्रमा, आता तू हे सारे रकाने भरून घेणार की काय? ९ गुणिले २४ म्हणजे किमान २१६ गुण लिहायचे?”
“नाही वेताळा, हळू हळू एक एक गुण पाहू. वेगवेगळ्या द्रव्यांना वेगवेगळे गुण लागू पडतात. २४ हा एकूण आकडा आहे. वरच्या सारणीत हिरव्या रंगाने दाखवले आहेत ते ते त्या द्रव्यांना लागू पडणारे गुण. आत्ता तुला आवाका लक्षात यावा म्हणून सांगितलं. आता पुढचं अंग पाहू..कर्म(Actions) हे ते अंग..”
“हे
कर्म सुद्धा सर्वांना लागू पडतं..?”
“कर्म
हे मुख्यत: पृथ्वी, आप, तेज व वायू यांनाच लागू पडते..
उत्क्षेपणापक्षेपणाकुञ्चनप्रसारणगमनानि
पञ्चैव कर्माणि ||4||
वर
फेकणे, खाली टाकणे, आकुंचन पावणे, प्रसरणपावणे व जात राहणे हे या हालचालीचे पाच प्रकार
आहेत.
आता या
चिमुकलीच्या बॅगेतील पृथ्वी, आप, तेज व वायू द्रव्ये व पाच प्रकारच्या हालचाली
यांची एक सारणी तयार करू
वैशेषिकातील कर्म
(Action in
Vaisheshik)
|
आधुनिक अर्थ
(modern meaning)
|
स्थायू - डबा
|
द्रव - पाणी
|
वायू - हवा
|
तेज - उष्णता
|
वर फेकणे
|
Throwing upwards
|
||||
खाली टाकणे
|
Throwing downwards
|
||||
आकुंचन
|
Contraction
|
||||
प्रसरण
|
Expansion
|
||||
गमन –
गोलगोल फिरणे
रिकामं करणे कंप पावणे
वर वाहणे
वरून खाली पायरी
पायरीने पडत येणे,
थेट खाली पडणे, वर
जाणे
|
Going -
Gyrating
Evacuating
Quivering
Flowing upwards
Transverse falling
Falling downwards
Rising
|
”
“अरेच्चा
म्हणजे हालचालींचा अभ्यास यात करायचा..पण हे पाच हालचालींचे प्रकार का? कोणत्या
द्रव्यांना कोणत्या हालचाली लागू पडतात?”
“वेताळा
ते तपशीलाने येईलच पुढे कधीतरी..तर आता आपल्या पंचेद्रियांना जाणवणारी द्रव्य,
गुण, कर्म ही अंगे पाहिली..आता बुद्धीने जाणवणारी तीन अंगे पाहू..सामान्य(classification), विशेष (individuality), समवाय (inherence) ही ती अंगे..”
“सामान्य
म्हणजे काय?”
“सामान्य
म्हणजे त्या पदार्थाचे वर्गीकरण कोणकोणत्या प्रकारे केले जाऊ शकते. प्रशस्तपाद म्हणतात..
सामान्यं द्विविधं |
परमपरञ्चानुवृत्तिप्रत्ययकारणम् |
तत्र परं सत्ता, महाविषयत्वात् |
सा चानुवृत्तेरेव हेतुत्वात् सामान्यमेव ||
वर्गीकरणाचे
दोन प्रकार आहेत: वरचा व खालचा. वरचा गट हा सर्वसमावेशक किंवा सर्वव्यापी
प्रकारातला. हा सर्वात मोठा गट म्हणजे जाणीवरूप अस्तित्वाचा असून तो जवळजवळ सर्वच
पदार्थांना व्यापतो व त्यामुळे तो जवळपास सगळीकडेच दिसतो. हा गट शुद्ध व सोपा आहे
व म्हणूनच सर्वव्यापी आहे.
द्रव्यत्वाद्यपरम्, अल्पविषयत्वात् |
तच्च व्यावृत्तेरपि हेतुत्त्वात् सामान्यं
सद्विशेषाख्यामपि लभते ||7||
काही
विशिष्ट द्रव्यांपुरताच असणारा खालचा गट हा तुलनेने लहान गट आहे. या गटातील
पदार्थांना भौतिक अस्तित्व असून ते इंद्रिय गोचर असते. या मुळेच या गटातील
पदार्थांना अणुस्तरवरही विशेष अस्तित्व असते. तेच त्यांचे वेगळेपणही ठरते. केवळ
यामुळेच त्यांचा वेगळा गट पडतो.”
“त्या
बॅगेच्या बाबतीत बोल”
“मुख्य
गट दोन..भूतांचा व महाभूतांचा. मग उपगटात कितीही उपगट सागता येऊ शकतात. खाली
दिलेल्या सारणीत ते गट दिले आहेत..
द्रव्य
|
शाळेच्या बॅगेतील
उदाहरणे
|
गट
|
उपगट
|
पृथ्वी (solid)
|
वह्या, पुस्तके,
बॅग, पेन्सिल, रबर, वॉटरबॅग, चुंबक, लोखंड चुरा, I-card, कंपासपेटी, खडू, चिप, डबा इत्यादि
|
भूतगट (material
existence)
|
शालोपयोगी साहित्य
प्रयोग साहित्य
२ री साठी लागणारे
साहित्य
|
आप
(liquid)
|
पाणी, डब्यातील
भाजीतील पाण्याचा अंश
|
भूतगट (material
existence)
|
पाण्याचा साठा करण्याची
भांडी
तापमानानुसार
पाण्याचे प्रकार
|
तेज
(energy)
|
डब्याचा गरम पणा
|
भूतगट (material
existence)
|
उष्ण पदार्थ
|
वायू (gas)
|
हवा, डब्यात
दाबलेला वायू, वॉटरबॅगेत रिकाम्या जागेत असलेला वायू
|
भूतगट (material
existence)
|
कमी दाबाची हवा
अधिक दाबाची हवा
|
आकाश
(plasma)
|
चुंबक व लोखंडाचा
कीस यांमधील चुंबकीय तरंग(magnetic waves), कंपास बॉक्सचा
होणारा खळ्ळ आवाज, डब्यातल्या वाट्या एकमेकांवर आपटून होणारा आवाज(sound
waves), चिपमधून GPS
कडे जाणारे तरंग (electro
magnetic waves)
|
महाभूतगट (Cognitive
existence)
|
शब्द (sounds)
जाणवणारे तरंग (waves
recognized by humans)
न जाणवणारे तरंग (waves
not recognized by humans)
|
दिक्
(space)
|
आधी बॅग बेडरूम
मध्ये होती, मग हॉल मध्ये, मग बसमध्ये, मग शाळेत, मग पुन्हा बस मध्ये, मग पुन्हा
घरी असे दिक् हे द्रव्य येउन जुळत राहिले
|
महाभूतगट (Cognitive
existence)
|
वर
खाली,
मागे
पुढे
|
काल (time)
|
पहाटे बॅग बेडरूम
मध्ये होती, मग ७ वाजता हॉलमध्ये, ८:३० वाजता बस मध्ये, ९ वाजता शाळेत, २:३० वाजता पुन्हा बसमध्ये, ३:३०
वाजता पुन्हा घरी असे काल हे द्रव्य त्या बॅग ला येऊन चिकटत राहिले.
|
महाभूतगट (Cognitive
existence)
|
सकाळ
संध्याकाळ
दुपार
|
मन (mind)
|
आइने सर्व
वह्या-पुस्तके आहेत की नाही ते पाहिलं
म्हणजे तिचं मन येऊन गेलं, लहान बहिणीनं उत्सुकता म्हणून त्यात डोकावलं म्हणजे
तिचं मन येऊन गेलं, आजोबांनी उचलून किती जड आहे ते पाहिलं म्हणजे त्यांचं मन
येऊन गेलं, बसमध्ये चढवणाऱ्या बाईनी ते उचललं म्हणजे त्यांचं, वर्गात काव्याच्या
शेजारी बसणऱ्या खट्याळ मुलाने त्यातली पेन्सिल काढली म्हणजे त्याचं अशी अनेक मनं
त्या बॅगेशी जुळून पुन्हा निघून गेली.
|
महाभूतगट (Cognitive
existence)
|
आनंदी
दु:खी
|
आत्मा
(soul)
|
आत्मा सर्वव्यापी
असल्याने तोही होताच.
|
महाभूतगट (Cognitive
existence)
|
”
“म्हणजे
वर्गीकरण करणं, त्याचे गट-उपगट करणं हे अभ्यास करणाऱ्यावर असतं..आता विशेष
(individuality)
अंग..काय हे विशेष?”
“वेताळा..वर
तो पदार्थ कुठल्या गटात मोडतो हे आपण पाहिलं..आता त्या पदार्थाचं स्वत:चं असं काय
विशेष आहे हे पाहायचं. प्रशस्तपाद म्हणतात
नित्यद्रव्यवृत्तयोऽन्त्या विशेषा: |
ते खल्वत्यन्तव्यावृत्तिहेतुत्वाद्विशेषा
एव ||
या
द्रव्यांमध्ये सूक्ष्मस्तरावर जाऊनही जे उरतं ते त्यांचं विशेषत्व. जोपर्यंत ते
वेगळे अस्तित्व त्याला इतरांपेक्षा वेगळं असं अस्तित्व असल्याचं दर्शवतं तो
पर्यंतच ते त्याचं विशेषत्व असतं. हे सरळ व सोपं आहे.”
“विक्रमा,
हे विशेषत्व सर्वांनाच लागू पडतं?”
“वेताळा,
महाभूते म्हणजे आकाश, काल, दिक्, मन व आत्मा यांचं विशेष म्हणजे ती स्वत:च. म्हणजे
यांचे तुकडे करत जाता येत नाहीत..उदाहरण म्हणजे काळाचे तुकडे केले तरी काळच हाती
लागतो..काळाचा अणू नाही कारण काळाला भौतिक अस्तित्व नाही..म्हणजेच या महाभूतांचं
दुसरे काही विशेष नाही..”
“आणि मग
भूतद्रव्ये म्हणजे पृथ्वी, आप, तेज व वायूचं काय?”
“वेताळा,
प्रशस्तपाद सांगतात त्याप्रमाणे या भूतांचे लहान लहान तुकडे करत गेले की शेवटी
त्यांचा एक अणू म्हणजे अविभाज्य कण हाती लागतो..म्हणजे वहीचा अणू वेगळा, डब्याचा अणू
वेगळा, बॅगचा अणू वेगळा, पेन्सिलीचा अणू वेगळा, खोडरबराचा अणू वेगळा, हवेचा वेगळा,
पाण्याचा वेगळा..”
“अच्छा
हा विशेष म्हणजे त्यांचा वेगळेपणा?”
“हो.
शेष म्हणजे शिल्लक राहिलेला भाग. विशेष म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण असा शिल्लक राहिलेला
भाग..या विशिष्ट अणुरेणू मुळेच तर तो इतर पदार्थांपेक्षा वेगळा आहे हे कळतं..हेच
ते वैशेषिक सूत्रांचं विशेष..आता राहता राहिल समवाय(inherence) हे अंग..”
“आहेच
का आणखी..याचं काय काम? याचा अभ्यास कशाला करायचा?”
“वेताळा,
याचा अभ्यास पदार्थाची संरचना लक्षात घेण्यासाठी होतो..त्या संरचनेतील अविभाज्य
घटक लक्षात घेण्यासाठी होतो..”
“विक्रमा
भरकटू नकोस रे..उदाहरण दे..”
“प्रशस्तपाद
म्हणतात
अयुतसिद्धानामाधार्य्याधारभूतानां य:
सम्बन्ध इह प्रत्ययहेतु: स समवाय : ||
एकमेकांपासून
वेगळे न काढता येऊ शकणारा संबंध जिथे दिसतो, म्हणजे पदार्थ व त्यातील अविभाज्य घटक
यात जो संबंध, तोच तो समवाय संबंध.
आपल्या उदाहरणाच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, त्या बॅगेचे धागे व बॅग यांच्यात अतूट संबंध आहे. वह्या व पुस्तकांची मुखपृष्ठे, पाने व शिवणीचा धागा यांचा पुस्तकावह्यांशी अतूट संबंध आहे. धागे निघाले की पत्रावळ्या झाल्यास समजा. शिसपेन्सिलीचा त्या शिशाशी व लाकडाशी समावय संबंध आहे. शिसे झिजले की पेन्सिल संपत जाते. बॅग भरण्यासाठी बॅगच नसली तर त्या भरलेल्या बॅगेला अर्थ नाही..अशा रितीने वेताळा पदार्थाची सहा अंगे आपण पाहिली..पदार्थाचा अभ्यास सुरु करायला सुरुवात झाली..सर्व अंगांचा सर्व तपशील माहिती होईल तेव्हा या शाळेच्या बॅगचा वैशेषिकाच्या दृष्टीने पूर्ण अभ्यास होईल..”
“छे बुवा..या साध्या शाळेच्या बॅग मध्ये एवढं सारं दडून बसलं आहे का? हा आवाका फार मोठा आहे रे! पण शेवटच्या समवाय संबंधाचं मीही एक उदाहरण देऊ शकतो”
“कोणतं?”
“जसा तुझा माझ्याशी..विक्रम-वेताळातला कोणीही एक नसला तर या जोडगोळीला अर्थ नाही..पण विक्रमा या तुझ्या वर्णनानंतर तर मी तुला सोडणं तर अशक्यच वाटतं..शिवाय अनेक प्रश्नही आहेत..आणि ही अंगेही अधिक तपशीलात जाऊन जाणून घ्यायची आहेत..येतो विक्रमा..आपला हा समवाय संबंध असाच चिरकाल राहो..हाऽहाऽऽहाऽऽऽ”
“छे बुवा..या साध्या शाळेच्या बॅग मध्ये एवढं सारं दडून बसलं आहे का? हा आवाका फार मोठा आहे रे! पण शेवटच्या समवाय संबंधाचं मीही एक उदाहरण देऊ शकतो”
“कोणतं?”
“जसा तुझा माझ्याशी..विक्रम-वेताळातला कोणीही एक नसला तर या जोडगोळीला अर्थ नाही..पण विक्रमा या तुझ्या वर्णनानंतर तर मी तुला सोडणं तर अशक्यच वाटतं..शिवाय अनेक प्रश्नही आहेत..आणि ही अंगेही अधिक तपशीलात जाऊन जाणून घ्यायची आहेत..येतो विक्रमा..आपला हा समवाय संबंध असाच चिरकाल राहो..हाऽहाऽऽहाऽऽऽ”
झालं..घोड्याने
त्याच्या वैरणीच्या पिशवीला एक पदार्थ मानलं व त्याची सहा अंगे कोणती याचा तो
विचार करु लागला
“..ओली वैरण..म्हणजे हरभरा हे पृथ्वी द्रव्य, तो ओला आहे म्हणजे
आप आले.पोत्यात हवा आहे म्हणजे वायू..पोतं उचलणं, टाकणं, दाबणं, सैल सोडणं ही
कर्मे..”
तेवढ्यात
त्याला दुसरा घोडा म्हणाला “अहो घोडापदार्थ, हे नवद्रव्यांनी भरलेलं शरीर आता हलवा..कर्म
करा गमनाचं..उशीर होतोय..”
(क्रमश:)
No comments:
Post a Comment