Showing posts with label dravya. Show all posts
Showing posts with label dravya. Show all posts

Friday, 22 December 2017

पदार्थांमध्ये चालणाऱ्या स्थिर–चर, दृष्य-अदृष्य अशा ९ द्रव्यांच्या खेळाची मजा पाहणे (How to enjoy the intermingling of nine Vaisheshika substances in the context of a Padarth)

पुन्हा एकदा अमावस्या जवळ आली. पुन्हा चंद्रबिंब काळवंडलं. पुन्हा रात्रीची घनगंभीरता वाढली. अमावस्या पौर्णिमेच्या चौकटीत बांधलेल्या काळाच्या प्रत्येक टप्प्यावर राजा विक्रमाच्या त्या राज्यात अनेकविध बदल घडत. शेवटी राज्य म्हणजे तरी काय? केवळ पृथ्वीद्रव्याने भारलेल्या जमिनी, राजवाडे, किल्ले का आपद्रव्याने व्यापलेल्या नदी, ओढे, नाले का वायुरूपाने अच्छादिलेला सर्व परिसर? का याहूनही अजून काही. केवळ भौतिकतावादी दृष्टिकोनातून तरी एवढंच. पण राजा विक्रमाला मात्र उमगलं होतं की त्याचं राज्य हा सुद्धा एका महाकाय पदार्थासारखाच होता. भौतिकतावादा नुसार जरी स्थायू, द्रव, वायू द्रव्यांनी परिपूर्ण असं राज्याचं वैभव असलं तरी याही पुढे त्याच्या राज्यात यज्ञाच्या रूपानं तेजाची आराधना, त्यागाची, सूर्यदेवतेची आराधना चालू होती, विविध मंत्रघोषांच्या, सद्विचारांच्या पावन घोषांच्या स्वरूपात त्याच्या राज्याच्या आकाश तत्त्वात विधायकता भरून राहिली होती. काल तत्वाच्या किंवा दिक् तत्त्वाच्या महाकाय सर्वव्यापी मापदंडांमध्ये त्याच्या राज्यात सर्वत्र विकासच आढळून येत होता. पण या सर्वांचं कारण केवळ त्याचे प्रजाजनच होते. प्रजाजनांची मन तत्त्वं विधायक कामाकडे लक्ष देत असल्याने, त्याचा उत्कर्ष त्यांना दिसत असल्याने, भौतिक सुख परिपूर्ण असल्याने त्याची आत्ततत्वेही सुखाचा अनुभव घेत होती. विक्रमाच राजाला त्याच्यासंबंधी सतत विचार करण्याची एक अशी पद्धतच पडून गेली होती.

“काय रे विक्रमा ही विचारांची पद्धत सुद्धा वैशेषिक गुरूंनी, पदार्थविज्ञान गुरूंनी घालून दिली काय तुला?” नेहमी प्रमाणेच विक्रमाच्या मनाभोवती घुटमळणाऱ्या विचारतरंगांना एखाद्या पुस्तकासारख्या वाचणाऱ्या वेताळाने विक्रमाला विचारले.
विक्रमराजा त्याच्या विचारसमाधीतून बाहेर पडत म्हणाला “तसं म्हणू शकतोस तू. खरेतर एकंदर आपण जेव्हा कोणत्याही गोष्टीचा सर्व बाजूंनी विचार करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा यातील काही गोष्टी आपोआपच विचारात घेतो. पण त्यातून काही मुद्दे सुटून जायची शक्यता असते. वैशेषिक आचार्यांनी बहुधा हाच विचार लक्षात घेऊन ही पदार्थाची ६ अंगे, ९द्रव्ये, ५ हालचाली इत्यादि संख्या निश्चित केल्या असव्यात. हेतू हा असावा की त्यातून पडताळणी करण्यासाठी निश्चित अशी यादी समोर असावी.”

“तू चाललास पुन्हा वाहात..थांबमी तुला जरा दिशा देतो..सर्वांच्याच घरात एक तुळशी वृंदावन असते. घरातील लहान मोठे, स्त्री पुरुष याची वेगवेगळ्यावेळी पूजा करतात. तुळस टवटवीत राहावी याची काळजी घेतात. तर मला सांग की हा तुळशीवृंदावन पदार्थ घेतला तर त्यातील नवद्रव्ये कोणती? त्या पदार्थाची ६ अंगे कोणती? थोडक्यात सांग. पाल्हाळ नको.”
“नवीन काळात कुठली रे तुळशी वृंदावने, पण तरीही लहान लहान कुंड्यांमध्ये तुळशी लावतातच.”



प्रशस्तपाद ऋषींनी द्रव्यांगाची लक्षणे सांगताना म्हटलंय की या द्रव्यांना अस्तित्त्व असते, त्यांना व्यक्त करता येते, त्यांना जाणून घेता येते, त्यांचे काही अन्योन्य संबंध असतात, ती संख्येने अनेक असतात, त्यांना गुण असतात, ते  हालचाली करतात, त्यांचा सजीवतेशी संबंध असतो, त्यांचे वर्गीकरण करता येते, त्यांचे काही विशेष अणुरूप, रेणुरूप अस्तित्त्व असते. त्यातील काही नित्य तर काही अनित्य असतात. काहींचा दुसऱ्यांवर परिणाम होतो तर काही नैमित्तिकच असतात. इतर द्रव्यांच्या निर्मितीला यातील काही कारण ठरतात. यातील काहींमध्ये इतर द्रव्ये आश्रयाला येतात तर काही आश्रयाला जातात. प्रशस्तपाद भाष्याच्या तिसऱ्या धड्यात हे सर्व विवेचन आलेले आहे.”

“विक्रमा, सदर्भ दिलास हे छान झालं. आता आपल्या उदाहरणात परत ये.”

तर या तुळशीच्या कुंडीभोवताली ही नवद्रव्ये कशी बागडत असतात ते पाहू. पहिलं म्हणजे पृथ्वीद्रव्य. तर कुंडी ही या द्रव्याची, आतील काळी किंवा लाल माती ही या द्रव्याची, तुळशीचं शरीर हे सुद्धा या पृथ्वी द्रव्याचं. दुसरं म्हणजे आप किंवा जलरूप द्रव्य. सकाळी पूजेच्या कलशातून वा इतर भांड्यातून हे द्रव्य वाहात वाहात वरच्या थरातून मुळापर्यत गेलं. काही मुळांनी शोषून घेतलं. काही मातीच्या कणांना चिकटलं. राहिलेलं गळून निघून गेलं. कारण वाहणं हा या आपद्रव्याचा गुण. शिवाय तुळशीच्या शरीरातील विविध रस, विकरे(enzymes) ही सुद्धा आपद्रव्याची.”

“विक्रमा, जास्त खोलात शिरु नकोस आत्ता..तेजा बद्दल सांग..”

“हो तर वातावरणात असलेली ऊब, ऊष्णता, मुळांच्या भोवती असणारी ऊब हे सर्व तेजाचे प्रकार. उष्णता, गारवा हे तेजाचे लक्षण. आताच्या शास्त्रानुसार ऊर्जेची विविध रूपे ही सुद्धा तेजरूपच. नंतरचे चौथे द्रव्य म्हणजे आकाशद्रव्य. तर या कुंडीभोवती सूर्यकिरणांतून येणारे विद्युत्चुंबकीय तरंग फेर धरून नाचताहेत ते तरंग म्हणजेच आकाशद्रव्य. शिवाय तुळशी कडे पाहून केलेले सद्विचार, म्हटली गेलेली स्तोत्रे हे शब्दतरंग. हे विविध तरंग म्हणजेच आकाशद्रव्याची उदाहरणे. जितके या आकाशात विधायक तरंग तेवढी प्रसन्नता मोठी..”

“विक्रमा, खोलात नंतर शिरूया रे..ही पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश द्रव्ये आपण पाहिली..म्हणजे चार भूतद्रव्ये व आकाश हे महाभूत पाहिले..आता दिक् व काल द्रव्यांविषयी सांग..”

“दिक् व काल ही सर्वव्यापी, सर्वसंचारी द्रव्ये. कधीही एका ठिकाणी न राहणारी. आपली घड्याळे ही केवळ कालाचे दर्शक. सकाळी ७ वाजता तुळशीला पूजेनंतर पाणी घातले. ९ वाजेपर्यंत घरातील सर्वांनी या तुळशीला जवळून, लांबून, कधी हात जोडून, कधी मनातल्यामनात असा नमस्कार केला..ऊन वाढल्यावर घरातील गृहिणीने दुपारी पुन्हा थोडे पाणी घातले. त्या आधी थोडे खुरपले. अशाप्रकारे या काळद्रव्याच्या संदर्भात वेगवेगळ्या गोष्टी घडल्या..”

“अच्छा म्हणजे कालद्रव्य हे केवळासंदर्भाठीच आहे? ते  स्वत: काहीच करत नाही?”

“नाही. ते केवळ संदर्भाला सहाय्य करते. तसेच काहिसे दिक् याद्रव्याचे. याचा अर्थ जागा. त्याच्याही मोजपट्ट्या माणसाने तयार केल्या. म्हणजे तुळशीच्या कुंडीची उंची इतकी, परिघ इतका, तिचे आकारमान इतके. तुळशी आणली तेव्हा एक वीत होती. आता एक फुटाची झाली असे दिक् द्रव्याचे विविध निर्देशक वेगवेगळ्या संदर्भात  येऊन चिकटतात व संदर्भ बदलल्यावर निघून जातात. अशाप्रकारे दिक् ही सुदरी मोजपट्टी. केवळ संदर्भाला साहाय्य करणारी..”

“आता मन व आत्मा..”

“या द्रव्यांसंबंधी स्थूलार्थाने काय बोलावं. कुंडी उचलताना हाताचा जिथे कुंडीशी संयोग झाला तेथे मन येऊन गेलं. नमस्कार करताना, पाहताना पाहणाऱ्याचं मन या तुळशीजवळ आलं व क्षणात उडून दुसरीकडे जाणाऱ्या फुलपाखरासारखं हे मनही दुसरीकडे उडून गेलं..”

“म्हणजे विक्रमा स्थल, काल, मन ही सर्वच अशी संदर्भाबरोबर उडणारी व बसणारी फुलपाखरं आहेत..त्यांचा काहीही परिणाम होत नाही तुळशीवर..”

“वेताळा स्थळ व काळ हीच नैमित्तिक आहेत. पण मनाला शक्ती आहे. मनामध्ये कार्यकारी शक्ती आहे. घरातील कोणी व्यक्ती या तुळशीची प्रसन्नतेने पूजा करत असेल, विधायक विचार करत असेल तर त्या विचारतरंगांमुळे तुळस तजेलदार दिसेल..ती मने ज्या सजीवांशी संबंधित असतात त्यांची आत्मद्रव्येही त्या तुळशीशी निगडित होतात..सुख, दुख, इच्छा, द्वेष हे या आत्म्यांचे गुण..”

“विक्रमा, आत्म्याविषयी तू मला सांगतोस? आत्मा हा सुद्धा न दिसणारा आहे. त्याला देहाश्रयाशिवाय व्यक्त होता येत नाही. म्हणून तर दर अमावस्येला या मृतशरीरात मला प्रवेश करावा लागतो..पण विक्रमा या तुळशी भोवती चालणाऱ्या विविध द्रव्यांच्या खेळासंबंधी सांगून त्यांच्या गुण या अंगाविषयी जाणण्याची उत्सुकता तू अधिकच ताणलीस..पण आता या मृतशरीराचा आश्रय सोडून जाण्याची वेळ झाली..पुन्हा भेटायचंय राजा..विसरू नकोस..हाऽहाऽऽहाऽऽऽ”

झालं..वेताळ गेला तसं आजुबाजूचे सारे स्थिरचर दर अमावस्येप्रमाणेच विचार मंथनात रममाण झाले.. 

“दर अमावस्येला झाकोळला जाणारा चंद्र सुद्धा आपल्याकडे कुणा आत्म्याचं लक्ष नाही हे पाहून स्वत:मधील द्रव्यांचा विचार बहुतेक करू लागला असावा..”त्या रात्री विक्रमा बरोबर आलेल्या राजकवीचने आपली कल्पना बोलून दाखवली..

विक्रमाने स्मितहास्य केलं व म्हणाला “राजकवीच तुम्ही..तुमचा आत्मा कल्पनारंजनाने तृप्त होतो..उद्याच्या सभेत यावर एक उत्तम काव्य तुम्ही ऐकवाच..”

“महाराजांची आज्ञा शिरसावंद्य..” राजकवींनी दुजोरा देत प्रणिपात केला..

विक्रमाने सारथ्याला प्रस्थान करण्याची आज्ञा दिली..अमावस्येचा अंधार आजुबाजूला असला तरी त्या सारथ्याच्या मनातला एक कोपरा ज्ञानाने उजळला होता..  


(क्रमश:)   

Saturday, 16 December 2017

सारांश: पदार्थाच्या सहा अंगांमधील साम्य व भेद स्थळे (Summary Table : Comparative analysis of the six facets of Padarthas)

खालील सारणीमध्ये सारांशरूपात पदार्थाच्या सहा अंगांमधील साम्यस्थळे व भेदस्थळे अनुक्रमे हिरव्या व लाल रंगांनी दर्शविण्यात आली आहेत.

साम्य/भेद
द्रव्य
(substance)
गुण
(
properties)
कर्म
(
Action)
सामान्य (classification)
विशेष (individuality)
समवाय
(
inherence)
अस्तित्त्व (being ness)






व्यक्त करता येणे (predicability)






जाणून घेता येणे (cognizability)






समवायित्व (Inherability)






अनेकत्व (Plurality)






गुण (Properties)






कर्म (Actions)






सत्ता सम्बन्ध (Relationship with being)






सामान्यत्व (Classification)






विशेषत्व (Individuality)






स्वसमयार्थभिधेयत्व (Denoted by the word Arth)






धर्मकर्तुत्त्व (Cause of virtue)






अधर्मकर्तुत्त्व (Cause of vice)






कार्य्यत्व (character of being an effect)






अनित्यत्त्व (non-eternal)






कारणत्त्व
(
quality of being the cause)    






द्रव्याश्रितत्व (quality of depending upon a substance)






स्वात्मसत्त्वम् (have sole being in themselves)






बुद्धिलक्षणत्वम् अकार्य्यत्वम् (cognitive faculty as sole indicator of not being an effect)






अकारणत्त्वम् (not being the cause)






अविशेषवत्त्वम् (having no particular generality)






नित्यत्त्वम् (being eternal)






अर्थशब्दानभिधेयत्त्वम् (not being expressed by word Arth)







Thursday, 9 November 2017

प्रकरण २: पदार्थधर्मसंग्रह: पदार्थाची सहा अंगे (Padarthsharmsangraha : Six facets of any entity according to Vaisheshika)

(टीप: प्रस्तुत लेखातील संस्कृत श्लोक हे प्रशस्तपादभाष्यातील, इंग्रजी अनुवाद हा महामहोपाध्याय पंडित गंगानाथ झा यांच्या इंग्रजी भाषांतरातून घेतला आहे. त्याखाली भावानुवाद केला आहे. नंतरच्या तिरक्या अक्षरातील मराठीतील टिपा उदाहरण या अर्थ सोपा करण्याच्या हेतूने देण्यात आल्या आहेत.

एखाद्या कॅलिडोस्कोप मधून साध्याच काचेच्या चुऱ्याच्या वेगवेगळ्या सुंदर रचना दिसाव्यात तसेच वैशेषिकांनी पदार्थाकडे पहायचे सहा दृष्टिकोन सांगितले आहेत. त्यांमधून कोणत्याही पदार्थाची सहा अंगे दिसतात. खाली दिलेल्या प्रश्नांच्या माध्यमातून या सहा अंगांविषयी माहिती दिली आहे. ते प्रश्नसुद्धा समजायला सोपे जावे म्हणून दिले आहेत.)

पदार्थ ज्या द्रव्यांचा बनलेला असतो ती द्रव्ये कोणती?

प्रशस्तपाद म्हणतात:
अथ के द्रव्यादय: पदार्था:, किञ्च तेषां साधर्म्यं विधर्म्यञ्चेति |
Question: Which are the categories, substance and the rest? And what are their similarities and dissimilarities?

पदार्थातील ती द्रव्ये कोणती? त्यांच्यातील सारखेपणा आणि वेगळेपणा कोणता?

वैशेषिक विश्लेषण पद्धतीचा हा पहिला टप्पा. यात पदार्थ कोणत्या द्रव्याचा बनला आहे याचा विचार होतो. 

तत्रद्रव्याणि पृथव्यप्तेजोर्वाय्वाकाशकालदिगात्ममनांसि सामान्यविशेषसंज्ञयोक्तानि नवैवेति |
तद्व्यतिरेकेणान्यस्य संज्ञानभिधानात् ||
Answer: Among these the substances are – Earth, Water, Light, Air, Plasma (Akash), Time, Space, Self and Mind. These mentioned in the sutra by their general as well as specific names, are nine only; as besides these none other is mentioned by name.

ती द्रव्ये म्हणजे स्थायू (solid), द्रव(liquid), ऊर्जा/उष्णता/प्रकाश(energy), वायू(gas), आकाश(plasma), काल(time), स्थल(space), आत्मा(self/atma) व मन(mind). वैशेषिक सूत्रांमध्ये नावांसहित वर्णन केल्या प्रमाणे ती संख्येने ९ इतकी भरतात. बाकी इतर कुठल्याही द्रव्याची नोंद सूत्रामध्ये नाही.

एक पदार्थ एकाच द्रव्याचा असेल असे नाही. याठिकाणी पाश्चात्य विज्ञान म्हणते त्या प्रमाणे बर्फ हा स्थायू , पाणी हा द्रव व वाफ हा वायू इतकाच अर्थ नाही. वैशेषिकाचा विचार करताना पदार्थाच्या संदर्भात कोणकोणती जुळलेली द्रव्ये असू शकतात  हे पहिले पाहिजे. 
सर्वप्रथम भूतद्रव्ये कोणती आहेत हे पाहूया. 
भूत द्रव्ये म्हणजे डोळे, कान, नाक, त्वचा व जीभ यांना त्या पाण्याविषयांनी जाणवलेले गुण व त्यामुळे कळलेली द्रव्ये.   
म्हणजे पाणी हा पदार्थ म्हटला तर तो 'द्रव(liquid)' रूप आहे हे आलच. पण जर पाण्याला रंग असेल वास असेल तर त्यामध्ये कोणतातरी 'स्थायू(solid)' द्रव्याचा अंश मिसळला आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. पाणी जर कोमट असेल तर त्यामध्ये उष्णतारूपात 'तेज'(heat/ thermal energy) द्रव्य आलेलं आहे. 

आता कोणती महाभूत द्रव्ये  तेथे आहेत ते पाहूया. ही  द्रव्ये म्हणजे इंद्रियांना न कळणारी तरीही जाणीवरूपात असणारी द्रव्ये. ती सर्व ठिकाणी असतातच असतात. त्यात पाहिलं म्हणजे पाणी ज्या भांड्यात आहे त्यानुसार त्याचं 'स्थल'(space) द्रव्य आलं. पाणी भांड्यात किती काळ आहे त्यावरून 'काल '(time) द्रव्य आलं . शिवाय पाण्यासंबंधी जी कंपने(waves, oscillations) आहेत ती त्या पाण्याच्या 'आकाश' द्रव्यात येतात. शिवाय पाण्यासंबंधी तुम्ही विचार करत असला (तो ग्लास अर्धा रिकामा किंवा अर्धा भरलेला आहे वगैरे) तर त्यात तुमचे 'मन'(mind) व 'आत्मा'(soul) द्रव्यही उतरतं  

पदार्थांचे गुण किती व कोणते?

गुणाश्च रूपरसगन्धस्पर्शसंख्यापरिमाणपृथक्त्वसंयोगविभागपरत्वापरत्वबुद्धिसुखदु:खेच्छाद्वेषप्रयत्नाश्चेति कण्ठोक्ता: सप्तदश |
चशब्दसमुच्चिताश्च गुरुत्वद्रवत्वस्नेहसंस्काराटदृष्टशब्दा: सप्तैवेत्येवं चतुर्विंशतिर्गुणा: ‌||
The qualities are: - colour, taste, odour, touch, number, dimension, separateness, conjunction, disjunction, distance, proximity, intellect, pleasure, pain, desire, aversion and effort; these are the seventeen that are directly mentioned in the Sutra. The word cha in the Sutra indicates the other seven viz. gravity, fluidity, viscidity, faculty, the two-fold invisible force and sound. These make up the twenty four qualities.

पदार्थाचे पूर्वापार पध्दतीने सांगितले गेलेले गुण म्हणजे: रूप/रंग, रस/चव, गन्ध/वास, स्पर्श/तापमान, संख्या, मिती/मोजमापे/परिमाण, वेगळे असणे, जोडलेले असणे, तुटलेले असणे, लांब असणे, जवळ असणे, बुद्धी, सुख, दु:ख, लालसा, द्वेष, गती निर्माण करणे  हे १७ गुण वैशेषिक सूत्रांमध्ये वर्णन केले गेलेले आहेत. याशिवाय यात न सांगितलेल्या गुरुत्वाकर्षण, प्रवाहीपणा, अप्रवाहीपणा, शारिरिक वा मानसिक शक्ती, धर्म/मोक्षगामी/विधायकतेकडे नेणारे बळ , अधर्म/विनाशगामी/विनाशकते कडे नेणारे बळ व शब्द/तरंग या ७ गुणांसह ही संख्या २४ इतकी भरते.

सर्वच द्रव्यांसाठी मिळून हे २४ गुण दिले गेलेले आहेत. प्रत्येक पदार्थाशी जोडल्या गेलेल्या द्रव्यांवरही त्या पदार्थाचे गुण अवलंबून असतात. या २४ पैकी प्रत्येक द्रव्यानुरूप वेगवेगळे गुणांचे गट लागू पडतात. पदार्थानुरुप हे गुण असतील किंवा नसतीलही. इथे केवळ सर्व गुणांचा आवाका लक्षात आणून दिला आहे. वर दिलेल्या पाण्याच्या उदाहरणात पाहिल्याप्रमाणे त्यातील सर्व घटक द्रव्यांचे गुण याठिकाणी पाहिले पाहिजेत. आधुनिक भौतिकशास्त्रात या सर्व गुणांचा अभ्यास करण्यासाठी वेगवेगळी उपशास्त्रे निर्माण झाली आहेत व मोजमापांसाठीची उपकरणे तर मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत व त्यांमध्ये अचूकताही आलेली आहे.

वैशेषिकातील गुण
(Property in Vaisheshik)
आधुनिक अर्थ
(modern meaning)
आधुनिक विद्याशाखा
(Modern Branch of study)
मोजमापनयंत्र
(Instrument to measure)
एकक
(measurement unit)
रूप
Colour
Colorimetry
Spectrophotometer
Candela
रस
Taste



गन्ध
Odour

Olfactometer

स्पर्श
Temperature

Thermometer
Celsius
संख्या
Number
Statistics
Number Systems

परिमाण
Dimension
Measurements of length, breadth, volume etc
Vernier calliper, measurement tapes
Meter
पृथकत्व
Separateness



संयोग
Conjunction



विभाग
Dis-junction



परत्व
Distance
Kinetics

Meter
अपरत्व
Proximity



बुद्धि
Intellect



सुख
Pleasure



दु:ख
Pain



इच्छा
Desire



द्वेष
Aversion



प्रयत्न
Effort
Kinetics


शब्द
Wave
Waves and Oscillations
Oscilloscope
Hertz
गुरुत्त्व
Gravity
Gravitation


द्रवत्व
Fluidity
Mechanics


स्नेह
Viciousness
Mechanics


संस्कार
Faculty



दृष्ट
Constructive Force
Mechanics

Newton
अदृष्ट
Destructive Force
Mechanics

Newton

पदार्थांच्या हालचालींचे प्रकार किती व कोणते?

उत्क्षेपणापक्षेपणाकुञ्चनप्रसारणगमनानि पञ्चैव कर्माणि |
Throwing upwards, throwing downwards, contracting, expanding, and going – these are the only five actions.

वर फेकणे, खाली टाकणे, आकुंचन पावणे, प्रसरणपावणे व जात राहणे हे या हालचालीचे पाच प्रकार आहेत.

यातील पहिल्या दोन हालचाली या अदृश्य बळ व गुरुत्वाकर्षणाशी संबंधित आहेत. नंतरच्या दोन या अदृश्य बळ व पदार्थाची स्थितीस्थापकता यांच्याशी संबंधातल्या आहेत. पाचवी क्रीया ही मात्र संमिश्र स्वरूपाची आहे व ती अनेक क्रीयांचा गटच आहे. 

गमनग्रहणाद्भ्रमणरेचनस्यन्दनोर्ध्वज्वलनतिर्य्यक्पतननमनोन्नमनादयो गमनविशेषा न जात्यन्तराणि ||

Because of the mention of the going : all such actions such as gyrating, evacuating, quivering, flowing upwards, transverse falling, falling downwards, rising and the like, being the particular forms of Going, and not forming distinct classes by themselves.

गोलगोल फिरणे, रिकामं करणे, कंप पावणे, वर वाहणे, वरून खाली पायरी पायरीने पडत येणे, थेट खाली पडणे, वर जाणे आणि अशा अन्य क्रीया या ‘जात राहणे’ या वर नमूद केलेल्या गटातच मोडतात. त्यांचे वेगळे गट पाडायची आवश्यकता नाही.

आधुनिक भौतिकशास्त्रामध्ये या संबंधीचा अभ्यास मोठ्या प्रमाणात झाला. अगदी पुरातन ग्रीक चिंतकांपासून ते न्यूटनची पारंपारिक भौतिकी व नंतर आइनस्टाईन पर्यंत या गतीचा सर्वांनीच वेगवेगळा अभ्यास केला आहे. पारंपारिक भोतिकी(classical physics), पुंज भौतिकी(quantum physics), यामिकी(mechanics), पुंज यामिकीपर्यंत(quantum mechanics) याविषयी खूपच अभ्यास व संशोधन झालेले आहे.

पदार्थांचे वर्गीकरण कसे करायचे? ते वर्ग कोणते?

सामान्यं द्विविधं |
परमपरञ्चानुवृत्तिप्रत्ययकारणम् |
तत्र परं सत्ता, महाविषयत्वात् |
सा चानुवृत्तेरेव हेतुत्वात् सामान्यमेव ||

Of generality or community, there are two kinds; the higher and lower; and it serves as the basis of inclusive or comprehensive cognition. The higher (or highest) generality is that of ‘being’; as it is this that- extends over the largest number of things; and also because it is this alone that is generality pure and simple, always serving, as it does, as the basis of comprehensive cognitions.

वर्गीकरणाचे दोन प्रकार आहेत: वरचा व खालचा. वरचा गट हा सर्वसमावेशक किंवा सर्वव्यापी प्रकारातला. हा सर्वात मोठा गट म्हणजे जाणीवरूप अस्तित्वाचा असून तो जवळजवळ सर्वच पदार्थांना व्यापतो व त्यामुळे तो जवळपास सगळीकडेच दिसतो. हा गट शुद्ध व सोपा आहे व म्हणूनच सर्वव्यापी आहे.

वरचा गट हा महाभूतांचा गट असून यात आकाश, काल, स्थल, मन व आत्मा ही द्रव्ये असतात. या द्रव्यांना जाणीव रूपातील अस्तित्व आहे. मूळात या वर्गीकरणापासून एकंदरित भारतीय वर्गीकरणशास्रांचा उगम होतो. आधुनिक शास्त्रातील गटाची संकल्पना (Set Theory) ही याच्याशी संबंधित आहे पण ती मूलत: गणिती अंगाने जाते.


द्रव्यत्वाद्यपरम्, अल्पविषयत्वात् |
तच्च व्यावृत्तेरपि हेतुत्त्वात् सामान्यं सद्विशेषाख्यामपि लभते ||

The lower generalities are ‘substance’ and the rest, which extend over limited number of things. These latter being the basis of inclusive as well as exclusive cognitions, are sometimes regarded as individualities also.

काही विशिष्ट द्रव्यांपुरताच असणारा खालचा गट हा तुलनेने लहान गट आहे. या गटातील पदार्थांना भौतिक अस्तित्व असून ते इंद्रिय गोचर असते. या मुळेच या गटातील पदार्थांना अणुस्तरवरही विशेष अस्तित्व असते. तेच त्यांचे वेगळेपणही ठरते. केवळ यामुळेच त्यांचा वेगळा गट पडतो.

खालचा गट हा भूतांचा असून त्यात स्थायू, द्रव, वायू व ऊर्जा/तेज/उष्णता ही द्रव्ये येतात. या द्रव्यांना इंद्रीयांनी जाणून घेता येते. या द्रव्यांना सूक्ष्मस्तरावरही अणुरूप जडरूप अस्तित्व असते. हेच विशेषत्व किंवा अणुत्व होय. वैशेषिक तत्वज्ञानातील विशेषत्व ते हेच.   

पदार्थाचा लहानात लहान कण कोणता?

नित्यद्रव्यवृत्तयोऽन्त्या विशेषा: |
ते खल्वत्यन्तव्यावृत्तिहेतुत्वाद्विशेषा एव ||

The ultimate specializing factors inhering in eternal substances are the individualities. In as much as they serve the purpose of absolute exclusion, they are individualities, pure and simple.

या कायम जडरूप किंवा भौतिक अस्तित्व दर्शवणाऱ्या द्रव्यांमध्ये सूक्ष्मस्तरावर जाऊनही जे उरतं ते त्यांचं विशेषत्व. जोपर्यंत ते वेगळे अस्तित्व त्याला इतरांपेक्षा वेगळं असं अस्तित्व असल्याचं दर्शवतं तो पर्यंतच ते त्याचं विशेषत्व असतं. हे सरळ व सोपं आहे.

स्थायूचा लहानात लहान कण हा स्थायूच असतो. उदाहरण म्हणजे सोनं. त्याचा लहानात लहान कण हा सोन्याचा अणू असेल. तो अणू हेच सोन्याचं विशेषत्व. जोपर्यंत तो द्रव्याच्या गुणांशी साधर्म्य दाखवतो तो पर्यंतच तो विशेष आहे. विशेषत्व पाहण्याच्या या अभ्यासात कोणतीही रासायनिक बदल अभिप्रेत नाही. म्हणजेच पाणी थंड केले किंवा तापवले तरीही ते पाणीच राहते. पाण्याचा रेणू हेच पाण्याचा विशेष. आधुनिक काळात डाल्टन, अवोगॅड्रो व रॉबर्ट ब्राऊन यांचे कार्य विशेषत्वाने उल्लेख करण्यासारखे आहे.

पदार्थाचे अविभाज्य घटक कोणते?

अयुतसिद्धानामाधार्य्याधारभूतानां य: सम्बन्ध इह प्रत्ययहेतु: स समवाय : |

Inherence is the relationship subsisting among things that are inseparable, standing to one another in the character of the container and the contained - such relationship being the basis of the idea that ‘this is that’.

एकमेकांपासून वेगळे न काढता येऊ शकणारा संबंध जिथे दिसतो, म्हणजे पदार्थ व त्यातील अविभाज्य घटक यात जो संबंध, तोच तो समवाय संबंध.

उदाहरणार्थ एक कापड व त्याचे धागे. धागे काढावेत तसे कापडाचे अस्तित्व संपत जाते. म्हणजे कापड व धागे यांच्यात समवाय संबंध असतो. पाण्याचा हायड्रोजन व ओक्सिजनशी जो संबंध तोही समवाय संबंध. थोडक्यात कुठल्याही पदार्थाचा त्याच्या अविभाज्य घटकाशी जो संबंध तो समवाय संबंध.